राम मंदिरासाठी सरकारने कायदा करावा – मोहन भागवत

0
444

नागपूर, दि. २५ (पीसीबी) – राम मंदिराच्या उभारणीसाठी कायदा  करण्यासाठी  सरकारवर दबाव आणण्याची गरज आहे.  त्यासाठी संपूर्ण समाज एकवटण्याचे काम आपल्याला करायचे आहे.  राम मंदिराच्या निर्माणानंतर सर्व भांडणे संपतील. त्यामुळे सरकारने आता लवकरात लवकर कायदा  करण्याची गरज आहे. न्यायालय निर्णय देत नसेल तर सरकारने कायदा करावा, अशी मागणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी  आज (रविवार) येथे केली. 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विविध संघटना आणि विश्व हिंदू परिषदेतर्फे  नागपुरात ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयात हुंकार सभा  आयोजित करण्यात आली होती. यावेळी मोहन भागवत बोलत होते.

यावेळी ते म्हणाले की,  राम मंदिराचा विषय हा न्यायालयाची प्राथमिकता आहे, असे वाटत नाही. न्याय उशिरा मिळणे म्हणजेच तो नाकारला जाणे. म्हणूनच राम मंदिराचा विषय न्यायालयात असला तरी त्यावर लवकरात लवकर निर्णय घ्या, असे आवाहन त्यांनी केले.  तसेच ‘जनहिताचे खटले न्यायालयात प्रलंबित कसे राहतात? रामजन्मभुमीवर इतर कोणी हक्क कसा सांगू शकते?’ असा सवालही त्यांनी यावेळी केला.