राधाकृष्ण विखे पाटील यांचा विधानसभा विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा ?

0
452

मुंबई, दि. १३ (पीसीबी) – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी  विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. पुत्र सुजय विखे पाटील यांनी भाजप प्रवेश केला आहे. त्यामुळे नैतिक जबाबदारी म्हणून त्यांनी राजीनामा दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळत   आहे.

अहमदनगरच्या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना राजी करण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी प्रयत्न करावेत, यासाठी राधाकृष्ण विखे-पाटील यांनी प्रतिष्ठा पणाला लावली होती.  मात्र, अहमदनगरची जागा  राष्ट्रवादी सोडण्यास तयार नसल्याने विखे –पाटील यांनी नाराजी व्यक्त केली होती.

दरम्यान, सुजय विखे पाटील यांनी  मंगळवारी ( दि. १२) भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे शिवसेना-भाजप सरकारवर टीका करण्याचा नैतिक अधिकार आपल्याला  नाही. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपदावरुन पायउतार होत आहे, असे विखे पाटील यांनी  म्हटले आहे.