“राणेंसारख्या गद्दाराची डाळ शिजू देणार नाही; त्यांच्यात हिमंत असेल तर त्यांनी …”: शिवसेनेच्या ‘या’ बड्या नेत्यांच राणेंना आव्हान

0
192

सिंधुदुर्ग, दि.०९ (पीसीबी) : शिवसेना नेते खासदार विनायक राऊत यांनी नारायण राणेंवर निशाणा साधला आहे. त्यांनी “आजच नव्हे तर भविष्यात कधीही नारायण राणे अंगावर आले तर त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ. सिंधुदुर्गात राणेंसारख्या गद्दाराची डाळ शिजू देणार नाही”, असा घणाघात राणेंवर केला आहे. एवढंच नाहीतर ते पुढे असंही म्हणाले कि, “हिमंत असेल तर नारायण राणे यांनी पुन्हा एकदा वैभव नाईक यांच्याविरोधात उभे राहून दखवावे, पराभव झाल्याशिवाय राहाणार नाही.”

“नारायण राणेंनी हिमंत असेल तर पुन्हा एकदा नाईक यांच्याविरोधात उभे राहावे, कुडाळ मालवणमधून निवडणूक लढवून दाखवावी. त्यांचे डिपॉझिट जप्त नाही केले तर शिवसेनेचे नाव सांगणर नाही. दोनदा नारायण राणेंच्या पोराचा पराभव झाला, एकदा त्यांचा झाला. सिंधुदुर्गात नारायण राणेंसारख्या गद्दारांची कधीचं डाळ शिजणार नाही हे जिल्ह्याने दाखवून दिल आहे”, असंही राऊत म्हणाले.

दरम्यान यावेळी बोलताना पात्रकमंत्री उदय सामंत यांनी देखील भाजपावर निशाणा साधला आहे. केंद्र सध्या काय करत आहे, त्यांचे सर्व कारनामे महाराष्ट्रातील जनता पाहात आहे. महाराष्ट्रातील मतदार याची नक्कीच दखल घेतील, आणि भाजपाला त्यांची जागा दाखवतील असे यावेळी सामंत यांनी म्हटले आहे. दरम्यान राऊतांच्या टीकेवर नारायण राणे काय प्रतिक्रिया देणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.