राज ठाकरेंनी घेतली जयंत पाटलांची भेट

0
374

मुंबई, दि. २९ (पीसीबी) – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची आज ( सोमवार)  भेट घेतली. या भेटीचा तपशील अद्याप समजू शकलेला नाही.

देशात ईव्हीएमविरोधात व्यापक मोहीम राबविण्यासाठी राज्यातील विरोधी पक्षांची मोट बांधण्यास  सुरूवात करण्यात येत आहे.  येत्या ९ ऑगस्टला क्रांती दिनी ईव्हीएमविरोधात विरोधी पक्ष एल्गार करणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याचे सांगितले जात आहे.