राज्य सरकारच्या नियमावलीत मॉल्स, धार्मिक स्थळे बंद

0
340

पिंपरी, दि. 31 (पीसीबी): केंद्र सरकारपाठोपाठ राज्य सरकारनेही अनलॉक-1 साठीची आपली नियमावली जाहीर केली आहे. राज्यात टप्प्याफटप्प्याने 3 जूनपासून याची सुरुवात होणार आहे. केंद्र सरकारने जरी नियमात शिथिलता दिली असली तरी राज्य सरकारने मात्र सावधगिरीने पाऊल टाकण्याचा निर्णय घेतल्याचे नियमावलीवर नजर टाकल्यानंतर दिसते. कंटेन्मेंट झोनमध्ये मात्र 30 जूनपर्यंत लॉकडाऊन सुरुच राहणार आहे. नियमात शिथिलता देताना सरकारने शॉपिंग मॉल्स, रेस्तराँ, धार्मिक स्थळे बंदच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, सायकलिंग, मॉर्निंग वॉक, व्यायाम याला मुभा दिली आहे. त्याचबरोबर सार्वजनिक मैदाने खुली होणार आहे. समुद्र किनारी जाण्यासही परवानगी दिली जाणार आहे.
दि. 8 जूनपासून सर्व खासगी कार्यालये 10 टक्के कर्मचाऱ्यांच्या क्षमतेसह सुरु राहतील. उर्वरित कर्मचारी घरुन काम करतील. आंतरजिल्हा बससेवेला परवानगी दिली असली तरी जिल्ह्याअंतर्गत बससेवा सुरु केली जाणार नाही.

* सकाळी 5 ते सायंकाळी 7 पर्यंत परवानगी
* दुचाकीवर एकाच व्यक्तीला प्रवास करता येणार
* मुलं, गरोदर महिला, ज्येष्ठ नागरिकांना घरातच थांबण्याचं आवाहन
* टॅक्सी, रिक्षा, कारमध्ये दोघांनाच परवानगी
* राज्यातील शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक प्रशिक्षण संस्था, कोचिंग क्लास बंद राहणार.
* चित्रपटगृह, जिम, जलतरण तलाव, मनोरंजन पार्क, रेस्तराँ, बार, ऑडिटोरिअम, मंगल कार्यालये बंद राहतील.
* केंद्रीय गृह मंत्रालयाच्या परवानगीखेरीज आंतरराष्ट्रीय हवाई प्रवास बंदच राहणार
* मेट्रो, रेल्वे बंद राहणार
* सलून, ब्युटी पार्लर, स्पा सेंटरही बंद राहणार
* शॉपिंग मॉल्सही बंद राहणार
* सामाजिक, राजकीय, क्रीडा, सांस्कृतिक, धार्मिक एकत्र येऊन साजरा होणाऱ्या कार्यक्रमांवर बंदी
* धार्मिक स्थळे बंद राहणार
* रात्री 9 ते पहाटे 5 पर्यंत महत्त्वाची सेवा वगळता संचारबंदी लागू राहिल.