राज्यात हुक्का पार्लरवर बंदी लागू करण्याची अधिसुचना जारी

0
592

मुंबई, दि. ७ (पीसीबी) – राज्य सरकारने हुक्का पार्लरवर बंदी घालण्याची निर्णय घेतला आहे.  याबाबतची अधिसूचना गृहविभागाने जारी केली आहे. सिगरेट आणि तंबाखू उत्पादनसंबंधी अधिनियम २००३ कायद्याचे उल्लंघन केल्यास १ लाख रुपये दंड आणि ३ वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. 

हुक्का पार्लर बंदी लागू करणारे महाराष्ट्र हे दुसरे राज्य ठरले आहे. याआधी गुजरातने हुक्का पार्लर बंदी लागू केली आहे. डिसेंबर २०१७ मध्ये झालेल्या नागपूर अधिवेशनात आमदार मंगलप्रभात लोढा यांनी विधीमंडळात हुक्का पार्लर बंदी विधेयकाचा प्रस्ताव मांडला होता. यावर्षी एप्रिलमध्ये हे विधेयक विधीमंडळात मंजूर करण्यात आले. त्यास राष्ट्रपतींनी मंजुरी दिल्यानंतर राज्य सरकारने ही अधिसूचना काढली आहे.

लोअर परळ येथे कमला मिलमध्ये डिसेंबर २०१७ मध्ये हुक्का पार्लरमुळे आग लागून १४ नागरिक  ठार झाले होते. त्यानंतर ही बंदी लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता.