राज्यात लोकसभेच्या शिवसेना-भाजपच्या जागा घटणार – नारायण राणे  

0
508

मुंबई, दि. २२ (पीसीबी) – लोकसभा निवडणुकीसाठी तिसऱ्या टप्प्यासाठी मंगळवारी (दि.२३) मतदान होत आहे. त्याआधी सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराची राळ उडवून दिली होती. एकमेकांवर आरोप प्रत्योरापाच्या फैरी झाडल्या जात होत्या.  आता राज्यामध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार, याबाबत चर्चा सुरु झाली आहे.  महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी राज्यातील लोकसभा जागांबाबत भाकीत केले आहे.

महाराष्ट्रातील ४८ जागापैकी भाजप १२ तर शिवसेना ९ – १० जागांवर विजयी होईल, तर आघाडीला  चांगल्या जागा मिळण्याची शक्यता आहे, असे रा्णे यांनी म्हटले आहे. काँग्रेसला ९ जागा तर राष्ट्रवादीला  ९ जागा  मिळतील, असा अंदाज  राणे यांनी  व्यक्त केला आहे.

दरम्यान,  रत्नागिरी सिंधूदूर्ग लोकसभा मतदारसंघात राणे यांचे पूत्र निलेश राणे यांच्याविरोधात शिवसेनेने मोठे आव्हान उभे केले. त्यामुळे राणे यांची चांगलीच दमछाक होण्याची शक्यता आहे. मात्र,    महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे उमेदवार निलेश राणे ६०  हजार मतांनी विजयी होतील,  असा विश्वास  राणेंनी  व्यक्त केला आहे.