राज्यात आम्हीचं मोठे भाऊ, मुख्यमंत्री पदाबाबत गिरीश महाजन म्हणतात…

0
490

मुंबई, दि, २२ (पीसीबी) – भाजपची आज मुंबई येथे सर्वपक्षीय बैठक झाली. या बैठकीनंतर भाजप नेते गिरीश महाजन यांनी शिवसेनेबाबत काही वत्कव्य केली आहेत. शिवसेनेच्या जागा निवडून येण्यासाठी आम्हीच प्रयत्न केला, असा दावा महाजन यांनी केला आहे. तसंच मुख्यमंत्रिपदाबाबतही महाजन बोलले आहेत.

यावेळी महाजन म्हणाले की, लोकसभेचा निकाल पाहता राज्यात भाजप मोठा भाऊ आहे. शिवसेनेच्या जागा निवडून येण्यासाठी आम्हीचं प्रयत्न केला. जिथे शिवसेना कमकुवत होती त्या ठिकाणी आम्ही मदत केली. तसेच राज्याचा मुख्यमंत्री हा भाजपचाचं असावा अशी सर्वांची भावना आहे,असं म्हणत गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्रिपद पुन्हा भाजपकडेच राहणार असल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे महाजन यांच्या या वक्तव्यामुळे युतीत मिठाचा खडा पडणार असल्याची शक्यता आहे.

दरम्यान राज्याच्या मुख्यमंत्री पदावर शिवसेनेकडून दावा केला जात आहे. नुकत्याच झालेल्या शिवसेनेच्या वर्धापनदिनी उद्धव ठाकरे यांनी सामनातून याबाबत जाहीर भाष्य केलं होतं. ‘आमचं सगळं ठरलं आहे. यापुढे सगळं समसमान पाहिजे,’ अशी भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नुकतीच जाहीर केली होती.