“राज्यातील ८० टक्के नोकऱ्या स्थानिकांना देण्यासाठी कायदा करणार”

0
352

मुंबई,दि.६(पीसीबी) – राज्यातील ८० टक्के नोकऱ्या स्थानिकांना देण्यासाठी कायदा करणार, असं विधान राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी विधीमंडळात महाविकास आघाडी सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर करताना केलं आहे.

अजित पवार यांनी आज ठाकरे सरकारचा पहिला अर्थसंकल्प विधीमंडळात मांडला आहे. यावेळी स्थानिकांना रोजगार मिळावेत यासाठी सरकार आग्रही असल्याचं ते म्हणाले आहेत. तसेच राज्यातील ८० टक्के नोकऱ्या या स्थानिकांना देण्यासाठी कायदा करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

उच्च तंत्रशिक्षणासाठी १३०० कोटी रूपयांचा निधी देण्यात येणार आहे. बरोजगारांना रोजगारक्षम बनवणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली. १० वी उत्तीर्णांनाही रोजगाराचं प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

दरम्यान, एसटीसाठी नव्या बसेस विकत घेण्यासाठी तसेच बस डेपो विकसित करण्यासाठी ४०० कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जुन्या बस बदलून नव्या बस उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहितीही अजित पवार यांनी दिली.