राजू शेट्टींनी घेतली खासदार उद्यनराजेंची भेट; भाजप प्रवेशाबाबत दिला ‘हा’ सल्ला

0
633

सातारा, दि. ४ (पीसीबी)  – स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी यांनी    खासदार  उदयनराजे यांची साताऱ्यातील शासकीय विश्रामगृहात आज (बुधवार) भेट घेऊन बंद दाराआड  चर्चा केली. या भेटीत उद्यनराजे यांना भाजपमध्ये जाऊ नका, अशी विनंती केल्याचे शेट्टी यांनी सांगितले.  

या भेटीनंतर शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत उद्यनराजेंच्या भेटीबाबत माहिती दिली. विरोध पक्षाला तुमच्या सारख्या नेत्यांची गरज आहे. तुमच्या सारखे लोक पक्षात हवे, असे सांगून भाजपमध्ये जाऊ नका, अशी विनंती केली. यावर उद्यनराजे यांनी अद्याप भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतलेला नाही, अशी माहिती दिली, असे शेट्टी यांनी सांगितले.

शेट्टी पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात जे सध्या सुरू आहे, त्याची आणि उदयनराजे भोसले यांची तुलना होऊ शकत नाही. केंद्रात आणि राज्यात विरोधी पक्ष असणे, हे सुदृढ लोकशाहीचे लक्षण आहे. पण विरोधी पक्ष दुबळा राहिल्यास जनमाणसाचा आवाज दाबला जाणार आहे. सत्ता कोणाची ही असो जनसामान्यांचा आक्रोश राज्यकर्त्यांपर्यंत पोचविणे व त्यातून त्यांना नीट वागायला लावणे ही विरोधी पक्षांची संवैधानिक जबाबदारी आहे. सर्वजण एकाच पक्षात जायला लागल्यास एकपक्षीय राजवट निर्माण होण्याचा धोका आहे. त्यातून सर्वसामान्याचा आवाज दाबला जाईल, अशी भीती शेट्टी यांनी व्यक्त केली.