रहाटणीत दुर्धर आजाराने ग्रासलेल्या अभियंत्याची आत्महत्या

0
861

चिंचवड, दि. १८ (पीसीबी) – एका दुर्धर आजाराने ग्रासलेल्या अभियंत्याने बारामजली इमारतीच्या गच्चीवरून उडी घेत आत्महत्या केली. ही घटना आज (गुरुवारी) साडेबाराच्या सुमारास रहाटणीतील रॉयल ग्रीन फेज १ सोसायटीमध्ये घडली.

रोहित बापूराव पाटील (वय २८, रा. रहाटणी, मुळगाव धुळे) असे आत्महत्या केलेल्या या अभियंत्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत रोहित हा इलेक्ट्रिक इंजिनिअर होता. तसेच तो हिंजवडी येथील एका कंपनीत कामाला होता. काही दिवसांपासून त्याला एका दुर्धर आजाराने ग्रासले होते. यामुळे तो अपल्या मोठ्या भावाच्या रहाटणी येथील घरी राहत होता. आज गुरुवार दुपारी रोहितचा भाऊ कामाला गेला होता तर त्याची वाहिनी घरात होती. या दरम्यान तो इमारतीच्या बाराव्या मजल्यावरील गच्चीवर गेला आणि तेथून खाली उडी घेतली. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या रोहितला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. वाकड पोलीस अधिक तपास करत आहेत.