योगेश गवळी युवा मंचच्या वतीने भोसरीत शिवजयंती उत्साहात साजरी; मोफत आरोग्य तपासणी शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद

0
539

भोसरी, दि. १९ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष योगेश गवळी युवा मंचच्या वतीने भोसरीतील पीएमटी चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सोमवारी (दि. १९) उत्साहात साजरी करण्यात आली. तसेच शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबीर घेण्यात आले.

या आरोग्य शिबीरात सुमारे दोन हजार नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच भोसरी परिसरात आरोग्यविषयक काम करणाऱ्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचीही मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.

यावेळी नगरसेविका प्रियांका बारसे, माजी नगरसेवक पंडित गवळी, जालिंदर शिंदे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष विशाल वाकडकर, शिक्षण मंडळाचे माजी सभापती निवृत्ती शिंदे, प्रभाग स्वीकृत सदस्य गोपी धावडे, भरत लांडगे, राजाराम महाराज फुगे, हरिभाऊ लोंढे, बाळू धावडे, सुदामराव माने पाटील, संतोष फुगे, अंकुश लोंढे, संतोष लांडगे, उमेश लोंढे, अमर फुगे, सचिन कंद, गणेश कंद, अतुल फुगे, स्वप्नील फुगे, निवृत्ती भोसले, विशाल काळभोर आदी उपस्थित होते.