युवकांनी वाईट प्रवृत्तींविरोधात लढण्याचे सामर्थ्य निर्माण करावे – राज्यपाल

0
253

नंदुरबार,दि.२२(पीसीबी) – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी जिल्हा दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवारी नंदुरबार तालुका विधायक समिती संचालित विधी महाविद्यालयात विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

यावेळी महिलांवरील अत्याचार दूर करण्यासाठी सक्षमीकरणासोबत पुरुषांच्या मनात महिलांविषयी सन्मानाची भावना निर्माण होणे गरजेचे आहे. हिंगणघीटसारख्या प्रकारांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी समाजातील वाईट प्रवृत्तींविरोधात लढण्याचे सामर्थ्य युवकांनी आपल्यामध्ये निर्माण करावे, असे आवाहन राज्यपालांनी केले.

यावेळी एका विद्यार्थिनीच्या प्रश्नाला उत्तर देतांना कोश्यारी यांनी महिला अत्याचाराच्या घटना केवळ पोलीस दल रोखू शकणार नसल्याचे मांडले. ही सामाजिक समस्या असल्याने सामाजिक जागृतीद्वारे या समस्येवर मात करता येईल. विधी शाखेच्या विद्यार्थ्यांंनी यासाठी पुढाकार घ्यावा असं म्हणाले आहेत.

एका विद्यार्थिनीने भ्रष्टाचाराचा मुद्दा मांडल्यावर, वकील झाल्यावर प्रामाणिकपणे काम करावे, स्वत: भ्रष्टाचार करणार नाही आणि इतरांना करू देणार नाही हा निश्चय करण्याचा सल्ला राज्यपालांनी दिला.