लासलगाव; सहा दिवसांपासून सुरू असलेली महिलेची मृत्यूशी झुंज अपयशी

0
320
नाशिक , दि.२१ (पीसीबी) – नाशिक येथील लासलगाव बस स्थानकात पेट्रोल अंगावर पडून गंभीर भाजलेल्या महिलेचा मुंबईत उपचारादरम्यान दुर्देवी मृत्यू झाला आहे. गेल्या सहा दिवसांपासून सुरू असलेली महिलेची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. भायखळा येथील मसिहा रुग्णालयात शुक्रवारी रात्री १२.३० वाजता पीडित महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालयाने दिली आहे. मुंबईतील जे.जे.रुग्णालयात मृत पीडित महिलेचे शवविच्छेदन केले जाणार असून त्यानंतर मृतदेह लासलगाव येथे तिच्या राहत्या घरी पाठवण्यात येणार आहे.