युतीचा विचार करू नका, कामाला लागा; उध्दव ठाकरेंच्या नेत्यांना सुचना

0
911

मुंबई, दि. ५ (पीसीबी) – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने कंबर कसली आहे. युती होणार की नाही याबाबत  भाजप शिवसेनेच्या इच्छुक उमेदवारांमध्ये संभ्रमावस्था आहे.  मात्र युतीबाबत विचार करु नका आणि निवडणुकीच्या कामाला लागा, अशा सूचना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी  आज (मंगळवार) शिवसैनिकांना दिल्या आहेत.

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या काही खासदार, आमदार, पदाधिकऱ्यांची बैठक मातोश्रीवर आज आयोजित केली होती.  या बैठकीला अनिल देसाई, मिलिंद नार्वेकर, आदेश बांदेकर  आदी नेते आणि प्रवक्ते उपस्थित होते.

या बैठकीत बोलताना उद्धव ठाकरे यांनी  नेत्यांना  निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना दिल्या.  युती होईल किंवा नाही होईल याची चिंता करू नका. तुम्ही तुमच्या कामाला लागा, असा आदेश त्यांनी दिला आहे.