पिंपरी-चिंचवडमधील अकील मुजावर यांची एमआयएमच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी निवड

0
834

पिंपरी, दि. ५ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड शहर एमआयएमचे माजी अध्यक्ष अकील मुजावर यांची पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

वंचित बहुजन आघाडीची नेहरूगर येथील एच. ए. मैदानावर नुकतीच सभा झाली. याच सभेत एमआयएमचे आमदार इम्तियाज जलिल यांनी अकील मुजावर यांची पक्षाने पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी निवड केल्याचे जाहीर केले. तसेच त्यांना नियुक्तीपत्र दिले. यावेळी भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर उपस्थित होते.