युतीचा तिडा सुटण्या आधीच चंद्रकांत पाटलांनी केली चार उम्मेदवारांची घोषणा

0
312

कराड, दि. २ (पीसीबी) – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युतीत जागा वाटपाचा तिडा कायम असताना भाजपाने चार उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. “युती होवो अथवा न होवो, वाईतून मदन भोसले, कोरेगावातून महेश शिंदे, दक्षिण कराड मतदारसंघातून अतुल भोसले आणि कराड उत्तरेतून मनोज घोरपडे हे भाजपाचे उमेदवार असतील”, अशी घोषणा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

वाई येथे शनिवारी झालेल्या सभेत बोलताना त्यांनी घोषणा केली.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, “कोणत्याही परिस्थितीत भाजप आणि शिवसेनेची युती होणारच आहे. भाजपा आणि शिवसेनेतील काही जागांची अदलाबदलीचा विषय आहे. तो समन्वयातून सोडवू”, असे पाटील यांनी सांगितले होते. मात्र विजय बुथ संमेलनाच्या निमित्ताने रविवारी सातारा जिल्हा दौऱ्यावर आलेल्या प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी थेट भाजपा उमेदवारांच्या नावाची घोषणा करून खळबळ उडवली आहे. विशेष म्हणजे निवडणुकीच्या तयारीला लागा अशा सूचना पाटील यांनी उमेदवारांना दिल्या.