या “मिस वर्ल्ड”चा रिपोर्ट आला कोरोना पॉझिटिव्ह

0
283

मुंबई ,१२ (पीसीबी) : बिग बी अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर आता अभिनेत्री ऐश्वर्या रॉय बच्चन आणि आराध्या बच्चन यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.

अभिनेत्री जया बच्चन यांची कोरोना टेस्ट मात्र निगेटिव्ह आली आहे. अमिताभ बच्चन यांची प्रकृती स्थिर आहे. काल रात्री बिग बी अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये भर्ती करण्यात आलं आहे. दरम्यान आता बिग बी अमिताभ आणि अभिषेक बच्चन यांची प्रकृती स्थिर आहे. नानावटी हॉस्पिटलकडून माहिती देण्यात आली आहे. त्यांना कोविड 19 ची काहीशी लक्षणं आहेत. ते सध्या नानावटी सुपर स्पेशिलिटी हॉस्पीटलमध्ये आयसोलेशन यूनिटमध्ये भरती आहेत. 

बच्चन कुटुंबियांच्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांची माहिती बीएमसीकडून घेण्यात येत आहे. तसंच अमिताभ बच्चन यांचा जुहूमधला ‘जलसा’ बंगला आता सॅनिटाईझ करण्यात आला असून ‘कोविड-१९ प्रतिबंधक क्षेत्र’ म्हणून घोषित करण्यात आलेला आहे.