‘या’ काँग्रेस जिल्हाध्यक्षांचा राजीनामा; अपक्ष विधानसभा लढवणार  

0
468

कोल्हापूर, दि. ५ (पीसीबी) – कोल्हापुरातील  काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे यांनी येणारी विधानसभा निवडणूक ही काँग्रेस पक्षावर लढवणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे ते आता भाजप किंवा शिवसेनेत जाणार की अपक्ष निवडणूक लढवणार?  याकडे जिल्हयाच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले  आहे.

राष्ट्रवादीचे कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे कोल्हापूरमध्ये राष्ट्रवादीला खिंडार पडले आहे.  आता  आवाडे यांनीही काँग्रेस सोडण्याची तयारी केली असल्याने आघाडीला मोठा धक्का बसणार आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत आघाडीची चिंता वाढली आहे.

दरम्यान,  राष्ट्रवादी पाठोपाठ आता  काँग्रेसमधून अनेक नेते बाहेर पडू लागले आहेत.  अब्दुल सत्तार, राधाकृष्ण विखेपाटील, सुजय विखे, यांनी लोकसभा निवडणुकीवेळी पक्षाला रामराम केला आहे. तर इंदापूरचे माजी आमदार हर्षवर्धन पाटील आणि अहमदनगर जिल्ह्यातील आमदार  भाऊसाहेब कांबळे हेही भाजपच्या वाटेवर आहेत.