अहमदनगरमधील भाजप सरपंचासह कार्यकर्त्यांनी रोहित पवारांच्या उपस्थितीत केला राष्ट्रवादीत प्रवेश

0
774

अहमदनगर, दि. ५ (पीसीबी) – भाजपचे दुधोडीचे अध्यक्ष संतोष कोराळे, सरंपच राजेंद्र परकाळे, बाळासाहेब भोसले, अमोल हरीभाऊ, राजेंद्र जांभळे, नाना कोराळे यांच्यासह बहुजन रयत परिषदेचे जिल्हाध्यक्ष संजय भिसे आणि कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवानेते रोहित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

यावेळी रोहित पवार म्हणाले, कर्जत-जामखेडची निवडणूक जनतेन हातात घेतली आहे. यामुळे मतदारसंघात नवे पर्व सुरू झाले आहे. अनेकजण पक्षात येत आहेत, येणार आहेत. कारण जनतेला बॅनर लावून विकास होत नाही हे आता समजले आहे.

कर्जत तालुक्यातील अनेक मुलींना शिक्षणासाठी नऊ किलोमीटर पर्यंत पायी शाळेत जावं लागतं. शनिवारी लवकर शाळा सुटल्यावर टेम्पोला लटकून घरी यावं लागते. हाच विकास आहे का? आम्ही पाण्यासाठी चारी खोदून देतो म्हटल्यावर पालकमंत्र्यांनी धावपळ करून चारी खोदण्यास सुरूवात केली, असं सांगत रोहित पवारांनी राम शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.