याल तर तुमच्यासह, अन्यथा तुमच्याविना; मुख्यमंत्र्यांचा इशारा

0
634

मुंबई, दि. ४ (पीसीबी) – ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मित्रपक्षांनी पाठिंबा दिला, तर आम्ही त्यांचे खासदार पाठवू; अन्यथा आम्ही आमचे खासदार निवडून आणू,’ असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी मित्रपक्ष शिवसेनेला दिला. ‘कोणी काही छापले किंवा लिहले तरी राज्यात आजही भारतीय जनता पक्षच क्रमांक एकचा पक्ष आहे आणि राहील,’ असा दावाही त्यांनी या वेळी केला.