यापुढे व्हॉट्सअॅपचा प्रोफाइल फोटो डाउनलोड करता येणार नाही; हे महत्त्वाचे बदल होणार

0
349

मुंबई, दि. ३१ (पीसीबी) – ग्राहकांना सुविधा देण्यासाठी व्हॉट्सअॅपकडून अॅपमध्ये सतत बदल केले जातात. आता व्हॉट्सअॅप मध्ये अल्बम ले-आऊट आणि ऑडियो फॉरमॅट करण्याचं फिचर येणार आहे. सोबतच, दुसऱ्याचा प्रोफाइल फोटो आपल्या मोबाइलमध्ये सेव्ह करता येण्याचं फिचर व्हॉट्सअॅपकडून बंद करण्यात येणार आहे. व्हॉट्सअॅपमध्ये कॉन्टॅक्टच्या प्रोफाइल फोटोत जाऊन शेअरचा पर्याय निवडल्यावर प्रोफाइल फोटो सेव्ह करण्याची सोय होती. मात्र, यूजर्सच्या सुरक्षेखातर हे फिचर व्हॉट्सअॅपमधून काढून टाकण्यात येणार असल्याचे समजतंय. व्हॉट्सअॅपने कॉन्टॅक्टसचे प्रोफाईल फोटो कॉपी किंवा शेअर करण्यावर निर्बंध लावले आहेत. असं असलं तरी व्हॉट्सअॅप ग्रुपचे फोटो डाऊनलोड अथवा शेअर करता येणं शक्य आहे.