यापुढे कुणाचाही निवडणूक प्रचार करणार नाही – फेसबुक

0
798

सॅन फ्रान्सिस्को, दि. २१ (पीसीबी) – अमेरिकेमध्ये २०१६ मध्ये झालेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या प्रचारात सक्रिय सहभाग घेणाऱ्या फेसबुकने यापुढे कुणाचाही निवडणूक प्रचार करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निवडणूक प्रचारासाठी २०१६ मध्ये त्यांच्या कार्यालयात कर्मचाऱ्यांना पाठवण्यात आले होते. मात्र आता कोणाच्याही निवडणूक प्रचारात भाग घेण्यासाठी कर्मचाऱ्यांना पाठवण्यात येणार नसल्याचे फेसबुकने स्पष्ट केले आहे.