…म्हणून या पॅकेजचा अर्थव्यवस्थेला काहीही फायदा होणार नाही – पृथ्वीराज चव्हाण

0
332

मुंबई,दि.२(पीसीबी) – मोदी सरकारने 20 लाख काेटींचे पॅकेज जाहीर केले असले तरी त्यामधून गरीब, मजूर, शेतकरी व नाेकरदारांच्या हातात काहीच पैसे मिळार नाहीत म्हणून या पॅकेजचा अर्थव्यवस्थेला काहीही फायदा होणार नाही, असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे.

आपल्याकडे उत्पादन निर्मिती केली जात असली तरी जाेपर्यंत लाेकांच्या हाती पैसे येणार नाहीत ताेपर्यंत या वस्तू खरेदी काेण करणार? असा सवाल पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र सरकारला केला आहे. ब्रिटनच्या सरकारने तेथील मजुरांना सव्वा 2 लाख रुपये व अमेरिकेने 70 हजार दरमहा मदत केलेली आहे, मग ती सरकारे वेडी आहेत का? आपल्याकडे लाॅकडाऊन शिथिल करताना उद्योग सुरू करून अन‌् उत्पादन निर्मिती केली जात असली तरी लोक वस्तू खरेदी कश्या करणार, असा सवाल चव्हाण यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान काेराेनामुळे जीव वाचवायचा की राेजगार, असा प्रश्न आज मजुरांसमाेर आहे. माझ्या मते डिसेंबर 2021 पर्यंत काेराेनावर लस येण्याची शक्यता नाही, त्यामुळे पुढचा काही काळ आपल्याला काेराेनासाेबत राहण्याची मानसिकता करावी लागेल. इंग्लंड, अमेरिका, जर्मनीसह इतर देशांनी तेथील मजुरांच्या खात्यात थेट पैसे जमा केले आहेत. जाेपर्यंत या लाेकांच्या हाती पैसे येणार नाहीत ताेपर्यंत ते वस्तू खरेदी करू शकणार नाहीत, असं ते म्हणाले.