लॉकडाऊनमध्ये दिलेली शिथिलता म्हणजे कोरोना संपला असे नाही – मनोविकार तज्ज्ञ डॉ. भूषण शुक्ल

0
238

पिंपरी, दि. 2 (पीसीबी):सरकारने केलेले लॉकडाऊनमध्ये दिलेली शिथिलता म्हणजे कोरोना संपला असे नाही तर लॉकडाऊननंतरचा काळ अधिक घातक ठरू शकतो असा अंदाज मनोविकार तज्ज्ञ डॉ. भूषण शुक्ल यांनी व्यक्त केला आहे.

आकुर्डी येथील डॉ. डीवायपाटील फार्मसी कॉलेजच्या वतीने आयोजित केलेल्या वेबिनारमध्ये ते बोलत होते.
कोरोना या जीवघेण्या विषाणूमुळे संपूर्ण जगावर संकट ओढवले आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे आपल्या देशातील नागरिक स्वकोंडीत असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात यश आले.

मात्र, कायमस्वरूपी लॉकडाऊन हा पर्याय नाही. संपूर्ण लॉकडाऊन शिथिलते नंतरचा काळ म्हणजेच याला कोरोनामुक्ती समजणे ही मानसिकता सर्वाधिक घातक ठरू शकते, असे मत डॉ. भूषण शुक्ल यांनी मांडले आहे.
शुक्ल पुढे म्हणाले कि, लॉकडाऊननंतरचा काळ अधिक शिस्त पाळली गेली पाहिजे. यासाठी फार्मसी शिक्षक व विद्यार्थी यांनी वैद्यक शास्त्राच्या साखळीतील महत्वपूर्णघटक म्हणून योगदान द्यावे असे ते म्हणाले.
वेबिनार दरम्यान भूषण शुक्ल यांनी मास्कचे प्रकार व मास्क लावण्याचे शास्त्रीय पध्दत, लॉकडाऊन मुळे निर्माण होवू शकणारे मानसिक प्रश्न, त्यावरील उपचार, सामाजिक अंतर अशा अनेक बाबींवर त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.