मोशीत तरुणीचा विनयभंग करुन भावाला मारहाण

0
1068

मोशी, दि. १ (पीसीबी) – एका २० वर्षीय तरुणीचा विनयंभ करुन तिच्या भावाला जबर मारहाण करण्यात आली. ही घटना सोमवारी (दि.३१) सायंकाळी सहाच्या सुमारास मोशीतील शिवाजीवाडी बसस्टॉपच्यासमोर घडली.

याप्रकरणी पीडित २० वर्षीय तरुणीने भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, बंटी बच्चे (रा. मोशी) या तरुणा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास मोशीतील शिवाजीवाडी बसस्टॉपच्यासमोर पीडित २० वर्षीय तरुणी बसची वाट पाहत उभी होती. यावेळी आरोपी बंटी बच्चे हा तेथे आला. त्याने तरुणीची छेडछाड काढून विनयभंग केला. यावेळी तरुणीच्या भावाने मध्यस्थी केली असता आरोपीने त्याला देखील मारहाण केली. याप्रकरणी  भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.  भोसरी एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.