मोशीतील ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाची महापौरांकडून पाहणी  

0
635

भोसरी, दि. १७ (पीसीबी) – मोशी कचरा डेपोमध्ये नव्याने होणाऱ्या ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पांतर्गत तयार होणाऱ्या १ हजार टन प्रतिदिन क्षमतेच्या मटेरियल रिकव्हरी फॅसेलिटी या प्रकल्पाची महापौर राहुल जाधव यांनी आज (सोमवार) पाहणी केली.

प्लॅस्टीक पासून ग्रॅन्युअल (प्लॅस्टीकचे दाने) फ्लेवर ब्लॉक बनविणे. तसेच बांधकामाच्या राडारोड्यावर प्रक्रिया करणाऱ्या प्रकल्पाची पाहणी करण्यात आली. तसेच हा प्रकल्प विधानसभा निवडणुकीपूर्वी पूर्ण करण्याच्या सुचना महापौरांनी अधिकाऱ्यांना दिल्या.  त्यानंतर या ठिकाणी महापौरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी आयुक्त श्रावण हर्डीकर, स्थापत्य पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता संजय कुलकर्णी, एस.एस.एन. इन्फ्रा कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.