मोशीतील यशस्वी इंग्लिश स्कुलच्या संस्थापक अध्यक्षांना “कार्यगौरव पुरस्कार”

0
642

भोसरी, दि. १५ (पीसीबी) – आमदार महेश लांडगे स्पोर्टफाऊंडेशनच्या वतीने मोशीतील यशस्वी इंग्लिश मिडीअम स्कुलचे संस्थापक अध्यक्ष सुभाष देवकाते यांना “कार्यगौरव पुरस्कार” देवून गौरविण्यात आले. तर, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शोभा देवकाते यांना “गुणवंत मुख्याध्यापिका” या पुरस्काराने गौरविण्यात आले.  

मोशी येथील खाणकामांच्या मुलांना शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी यशस्वी प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाची स्थापना करण्यात आली. तसेच त्यांना दर्जेदार इंग्रजी माध्यमातूनही शिक्षण घेता यावे, या उद्देशाने स्कूलची स्थापना करण्यात असून सद्य स्थितीला सुमारे ६०० विद्यार्थी या स्कुलमध्ये शिक्षण घेत आहेत, अशी माहिती देवकाते यांनी दिली.