मोरवाडी चौकात दुचाकीस्वार चोरट्यांनी तरुणाचा आय फोन केला लंपास

0
859

चिंचवड, दि. १२ (पीसीबी) – बसची वाट पाहत बसलेल्या एका तरुणाच्या हातातील ३० हजार रुपये किमतीचा आय फोन दुचाकीवरुन आलेल्या दोघा चोरट्यांनी हिसका मारुन चोरुन नेला. ही घटना शुक्रवार (दि.१०) रात्री सव्वानऊच्या सुमारास मोरवाडी चौकातील बसस्टॉपजवळ घडली.

याप्रकरणी अमित रामकृष्ण रस्तोगी (वय ३७, रा. किसन ग्रुप सोसायटी, मोरवाडी, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, दोन अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अमित हे शुक्रवारी रात्री सव्वानऊच्या सुमारास मोरवाडी चौकातील बसस्टॉपजवळ उभे होते. यावेळी एका दुचाकीवरुन आलेल्या दोघा चोरट्यांनी अमित यांच्या हातातील त्यांचा ३० हजार रुपये किमतीचा आय फोन ८ हा जबरदस्तीने चोरुन नेला. पिंपरी पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.