मोबाईलवर खेळण्यास मज्जाव केल्याने १३ वर्षीय मुलीची आत्महत्या

0
533

मुंबई, दि. १७ (पीसीबी) – आईने मोबाईलवर खेळण्यास मज्जाव केल्याने एका १३ वर्षीय मुलीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मुंबईतील वाकोला येथे घडली.

अक्षया मालवणकर (वय १३, रा. वाकोला, मुंबई) असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षया ही तिच्या कुटुंबासोबत वाकोला परिसरात राहत होती. ती इयत्ता ७ वीच्या वर्गात शिकत होती. अक्षयाला तासनतास मोबाईवरचा वापर करण्याचे व्यसन लागले होते. ही बाब अक्षयाच्या लहान भावाने आई-वडिलांनी सांगितली. तेव्हा आई रेवती हिने अक्षया हिची कानउघडणी करत मोबाईलपासून लांब राहण्यासाठी सांगितले. तू जर पुन्हा मोबाईलला हात लावता तर याची तक्रार तुझ्या वडिलांकडे करेन, असे सांगून आई रेवती आपल्या कामावर निघून गेली.  आईने मोबाईल वापरण्यास मज्जाव केल्याने अक्षयाने घरातील खुंटीला गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार अक्षया हिचे वडिल घरी आल्यानंतर उघडकीस आला. तेव्हा त्यांनी तत्काळ हा प्रकार पोलिसांना कळवला. वाकोला पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृत्यूची नोंद केली आहे.