मनसेला महाआघाडीत घेण्याबाबत अद्याप निर्णय नाही – अशोक चव्हाण

425

सोलापूर, दि. १७ (पीसीबी) – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मनसेला महाआघाडीत घेण्यासाठी राष्ट्रवादीकडून प्रस्ताव आलेला आहे. मात्र यावर अद्याप निर्णय झालेला नाही, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी  येथे बोलताना सांगितले.

संत सेवालाल जयंतीनिमित्त सोलापुरातील मुळेगाव तांडा येथे बंजारा समाजाच्या वतीने  मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी चव्हाण बोलत होते.

चव्हाण म्हणाले की, मनसेला आघाडीत घेण्यासंदर्भात मतभिन्नता आहे. त्यामुळे राज्यातील वरिष्ठ नेत्यांशी आणि केंद्रातील नेत्यांशी चर्चा करुन पुढील निर्णय घेण्यात येईल.

दरम्यान, अजित पवार आणि राज ठाकरे यांची काही दिवसांपूर्वी भेट झाली होती. राज ठाकरे यांच्यासोबत भेट झाल्यानंतर अजित पवार  यांनी म्हटले होते की, मी राज ठाकरेंना भेटलो. संवाद झाला पाहिजे, चर्चा झाली पाहिजे म्हणून आमची भेट झाली. मनसेला महाआघाडीत घेण्याबाबत काँग्रेसला कळवले आहे.  यावर चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे.