मोदींच्याविषयी सुप्रिया सुळेंचे विधान म्हणजे बालीशपणा; महादेव जानकरांचा पलटवार  

0
783

पुणे, दि. २ (पीसीबी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेले विधान म्हणजे बालिशपणा आहे, असा पलटवार राज्याचे मंत्री व रासपचे नेते महादेव जानकर यांनी पुण्यात बोलताना केला आहे.   

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्यावर टीका केल्याशिवाय हेडलाईन होत नाही, म्हणून नरेंद्र मोदींनी पवारांवर टीका केली, असे  खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले होते.  यावर जानकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे.  पंतप्रधान  मोदींना पवार कुटुंबावर टीका करून प्रसिद्धी मिळविण्याची काही गरज नाही. मोदींना  त्यांच्या कामातून प्रसिद्धी मिळत आहे, असे  जानकर  म्हणाले.

दरम्यान, गेल्या दहा वर्षात सुप्रिया सुळे यांची बारामती लोकसभा मतदार संघातील विकास कामे पाहता यंदा त्यांचा पराभव निश्चित आहे,  असे जानकर म्हणाले. दरम्यान, भाजपने सुळे यांच्या विरोधात आव्हान उभे करण्याचा प्रयत्न केला आहे. बारामतीत मोदी यांची सभा घेऊन वातावरण तापविण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.