मोदींचा अपमान करायचा नव्हता म्हणून गप्प बसलो- संजय राऊत

0
487

मुंबई,दि.१४(पीसीबी) – अमित शहा म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी वारंवार सभेत बोलत होते देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील तेव्हा तेव्हा शिवसेनेने आक्षेप का घेतला नाही? पण भरसभेत नरेंद्र मोदींचा अपमान करायचा नव्हता म्हणून त्यावेळी गप्प बसलो, असं प्रत्युत्तर शिवसेना नेते संजय राऊत यांनी शहांना दिलं आहे.

आम्ही पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा राखतो, उद्धव ठाकरे आणि अमित शहा यांच्यात बंद खोलीत काय झालं हे मोदींना सांगितलं गेलं नाही. शिवसेना आणि नरेंद्र मोदी यांचं नातं वेगळं आहे, असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

मोदी सर्व सभांमध्ये सांगत होते की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच होतील पण उद्धव ठाकरेही सांगत होते मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार, तेव्हा तुम्ही का रोखलं नाही? असा सवाल संजय राऊत यांनी अमित शहांना केला आहे. ते मुंबईमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.

दरम्यान, बंद खोलीतील विषय हा महाराष्ट्राच्या नेतृत्वाचा होती. दिल्या-घेतलेल्या वचनाचा होता, असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. यावेळी बोलताना संजय राऊतांनी भाजपवर पुन्हा एकदा जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.