“मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा अद्याप माझ्यासमोर आलेला नाही”

0
391

मुंबई,दि.३(पीसीबी) – मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा अद्याप माझ्यासमोर आलेला नाही, असं वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. मुस्लिम आरक्षणावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना उद्धव ठाकरे बोलत होते.

यावेळी “सरकारसमोर अद्याप मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा आलेला नाही. त्यामुळे कोणीही त्यावर कोणत्याही प्रकारची आदळआपट करण्याची गरज नाही,” असं मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं.

सरकारसमोर मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा आला नाही. त्याबाबत कोणतीही आदळआपट करण्याची गरज नाही. मुद्दा सरकारसमोर आल्यावर कागदपत्र तपासून त्यावर योग्य तो निर्णय घेतला जाईल. कोणीही आपली शक्ती वाया घालवू नये. शिवसेनेनं अद्याप कोणतीही भूमिका स्पष्ट केलेली नाही, असंही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाबाबतही वक्तव्य केलं. मराठा आरक्षणावर सरकार ताकदीनं लढत असल्याचं ते म्हणाले.

दरम्यान, मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार अध्यादेश काढणार असल्याची घोषणा अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी शुक्रवारी विधान परिषदेत केली होती. त्यानंतर अनेक चर्चांना उधाण आलं होतं.