मुळशी, भोर, वेल्हा आणि मावळ तालुक्यातील शाळांना बुधवारी सुट्टी – जिल्हाधिकारी

0
909

पुणे, दि. ६ (पीसीबी) – आपत्कालीन स्थिती कायम असल्यामुळे  बुधवारी (दि. ७)  मुळशी, भोर,वेल्हा आणि मावळ तालुक्यातील शाळांना सुट्टी राहील, असे  जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज (मंगळवार) केली आहे. 

आपत्कालीन व पूर स्थिती कायम असल्यामुळे  बुधवारी ( दि.७)  पुणे जिल्ह्यातील फक्त मावळ, भोर, वेल्हा आणि मुळशी तालुक्यातील सर्व प्री स्कूल,  प्राथमिक व माध्यमिक शाळा तसेच उच्च माध्यमिक व महाविद्यालये यांना सुट्टी जाहीर केली आहे.