मुलीच्या विनयभंग प्रकरणी बापावर गुन्हा दाखल

0
395

चाकण, दि. १२ (पीसीबी) – बापाने स्वतःच्या मुलीसोबत अश्लील चाळे करून तिचा विनयभंग केला. हा प्रकार गुरुवारी (दि. 11) सकाळी भोसे येथे घडला. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यानुसार 32 वर्षीय बापाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी सात वाजताच्या सुमारास पीडित मुलीच्या बापाने तिच्यासोबत अश्लील चाळे करून तिचा विनयभंग केला. याबाबत मुलीने तिच्या आईला सांगितल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यांनंतर याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.