मुलांमध्ये कला, खेळांच्या जागरूकतेसाठी ‘पीसीएमसी टीन-२० स्कुलोत्सव’चे आयोजन

0
511

पिंपरी, दि. १४ (पीसीबी) – मुलांमध्ये कला आणि खेळांच्या माध्यमातील जागरूकता निर्माण करण्यासाठी ‘पीसीएमसी टीन-२० स्कुलोत्सव अंतर्गत जागरूकता कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे आयोजन  महापालिकेचे कला, क्रीडा आणि साहित्य विभागाचे सभापती तुषार हिंगे यांनी केले आहे.

हा कार्यक्रम भारत सरकार उपक्रमांर्तंगत आहे. हा कार्यक्रम शिक्षकांसाठी  प्रथम  घेण्यात येईल. त्यानंतर पालकांसाठी असेल. हा कार्यक्रम शाळेत ब्रेनेक्स मास्टर्स द्वारे आयोजित केला जाईल. या सेमिनार मध्ये विद्यार्थांना व पालकांना खेळ, कला, व गुण कौशल्य हे त्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी कसे उपयुक्त ठरतात. या विषयी माहिती दिली जाणार आहे.

या कार्यक्रमासाठी शाळेकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. त्यामुळे शाळेतील सर्व शिक्षक आणि पालकांसाठी हा सेमिनार अनिवार्य  करण्यात यावा. कारण  ‘पीसीएमसी टीन-२० स्कुलोत्सवचे महत्व संपूर्ण समाजामध्ये पोहोचेल.  पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील सर्व शासकीय व खासगी शाळांमध्ये हा महत्त्वपूर्ण कार्यक्रम राबविणात येणार आहे.