दापोडी येथील हॅरीस पुलाला समांतर पूल बांधण्यासाठी २३ कोटी १५ लाखांच्या खर्चास मंजुरी   

0
657

पिंपरी, दि. १४ (पीसीबी) –  मुंबई-पुणे रस्त्यावरील दापोडी येथील मुळा नदीवर   हॅरीस पुलास दोन्ही बाजुस समांतर नवीन पूल बांधण्यात येणार आहे. या कामासाठी  सुमारे      २३ कोटी १५ लाख रुपये खर्चासह एकूण ८३ कोटी ७२ लाख रूपये खर्चासह शहरातील विविध विकास विषयक कामे करण्यासाठी येणा-या खर्चास आज (बुधवार) स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

स्थायी समिती सभागृहात  झालेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी विलास मडीगेरी होते.

स्मार्ट सिटी कार्यालय विकसित करणेकामी येणाऱ्या सुमारे २ कोटी ३६ लाख रुपयांच्या खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली. महापालिकेच्या सन २०१९-२० चे अंदाजपत्रकात पीएमपीएमल निधी या लेखशिर्षावर रुपये १९०.८३ कोटी तरतूद करणेत आली असुन त्यातील अंदाजित संचलन तुटीचे लेखापरिक्षण होऊन तूट कायम होईपर्यत ऑगस्ट २०१९ मध्ये  देण्यात येणाऱ्या सुमारे ७कोटी ५० लाख  खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली.