मुख्यमंत्र्यांनी मनसेची चड्डी काढण्याची भाषा केली; राज ठाकरेंनी सोलापूरच्या भर सभेत भाजपचीच चड्डी काढली

0
663

सोलापूर, दि. १६ (पीसीबी) – मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपने जाहीर केलेल्या डिजिटल गावाची सोमवारी (दि. १५) सोलापुरात झालेल्या सभेत पोलखोल केली. सरकारने अमरावती जिल्ह्यातील हरिसाल हे गाव डिजिटल गाव म्हणून जाहीर केले आहे. त्यासाठीच्या जाहीरातीत काम केलेल्या तरुणाला राज ठाकरे यांनी मनसेच्या मंचावर आणले. हा तरूण आता नोकरीच्या शोधात फिरत आहे. मनसेने ही पोलखोल केल्यानंतर भाजपचे हरिसालमधील स्थानिक कार्यकर्ते त्या तरुणाला शोधत आहेत. झालं-गेलं विसरून जा, परत ये. आम्ही तुम्हाला मदत करतो, असे भाजपचे कार्यकर्ते म्हणत असल्याचे राज ठाकरे यांनी सभेत सांगितले.

राज ठाकरे म्हणाले, “भाजपच्या डीजिटल गाव जाहीरातीतील हा तरूण आपल्या संपर्कात आला. मी जेव्हा हरिसालची पोलखोल केली त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हटले की राज ठाकरे तिथे गेलेच नाहीत. आता तरूणच मी तुम्हाला दाखवला आहे. तसेच हरिसाल गावातली परिस्थिती काय आहे? ही तुम्हाला पुन्हा एकदा दाखवली. आता मुख्यमंत्र्यांकडे यावर काय उत्तर आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.”

हरिसाल या गावात डिजिटलचा “ड” सुद्धा नाही हे वास्तव राज ठाकरे यांनी गुढी पाडवा मेळाव्यात दाखवला होते. या गावातील डिजिटल वास्तवाचे व्हीडिओ क्लिपच त्यांनी सभेत दाखवले होते. परंतु, मुख्यमंत्री फडणवीस यांनी हे आरोप फेटाळले होते. आता पुन्हा एकदा राज ठाकरे यांनी सोलापूरच्या सभेत तो व्हीडिओ दाखवून भाजपच्या डिजिटल गावाची पोलखोल केली आणि त्या जाहीरातीत काम केलेल्या तरूणालाच मंचावर आणून भाजपच्या दाव्यांना जोरदार धक्का दिला.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी एका सभेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अप्रत्यक्षपणे मनसेची चड्डी उतरवण्याची भाषा करत उपरोधिक टिका केली होती. परंतु, राज ठाकरे यांनी सोलापुरच्या सभेत जिवंत पुराव्यासह डिजिटल इंडिया योजनेची पोलखोल करत भाजपचीच चड्डी उतरवल्याचे मानले जात आहे.