‘मुख्यमंत्री ब्राह्मण आहेत, पंचांग पाहून मंत्रिमंडळाचा विस्तार करतील’- गुलाबराव पाटील

0
528

नाशिक, दि. २१ (पीसीबी) – मंत्रिमंडळ विस्तारात तुमचा समावेश होईल का? असा प्रश्न जेव्हा शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील विचारण्यात आला तेव्हा मुख्यमंत्री ब्राह्मण आहेत पंचांग पाहून मंत्रिमंडळाचा विस्तार करतील असे खोचक उत्तर त्यांनी दिले. त्यांना लक्षात येईल राहू कोण, केतू कोण? हे त्यांच्या लक्षात येईल असेही त्यांनी म्हटले आहे. नाशिकमध्ये ते पत्रकारांशी बोलत होते. एवढेच नाही तर आमचे श्रद्धास्थान मातोश्री आहे. तिथून जो आदेश येतो तो आम्हाला मान्य असतो मंत्रिमंडळात काय मिळणार हे माहित नाही असेही त्यांनी म्हटले आहे.