मुख्यमंत्री फडणवीसांची १ ऑगस्टपासून राज्यभर महाजनादेश यात्रा

0
641

मुंबई, दि. २१ (पीसीबी) – आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात १ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट  या दरम्यान,  महाजनादेश यात्रा  काढणार आहे.  तर दुसरीकडे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलही महाजनादेश यात्रा काढणार  आहेत.  या निमित्त मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष   राज्य पिंजून काढणार आहेत.

महाराष्ट्रात भाजप- शिवसेना युती होणार असल्याचे  निश्चित आहे. विधानसभेच्या तयारीसाठी शिवसेनेकडून युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी जन आशीर्वाद यात्रा सुरु केली आहे. त्यानंतर आता भाजपने देखील विधानसभेसाठी कंबर कसली आहे.

असा असेल भाजपचा विधानसभा निवडणुकीसाठीचा कार्यक्रम

२१ जुलै २०१९ – प्रदेश विस्तारित कार्यसमिती

२५ जुलै ते १० ऑगस्ट २०१९ – जिल्हासह शक्ती केंद्र प्रमुख बैठक

९ ऑगस्ट    – सदस्यता अभियान ड्राइव्ह

१ जुलै ते १५ ऑगस्ट – नवमतदार नोंदणी अभियान (युवा मोर्चा)

१५ जुलै ते १५ ऑगस्ट – विस्तारक योजना (सर्व शक्ती केंद्रांपर्यंत)

१० ऑगस्ट ते २५ ऑगस्ट – विधानसभाश: बूथ कार्यकर्ता संमेलन

१ ऑगस्ट ते १२ ऑगस्ट – शक्ती सन्मान महोत्सव (रक्षाबंधन पर्व) (बुथस्तरावर व मंडल स्तरावर राखी संकलन)

१६ ऑगस्ट – रक्षाबंधन कार्यक्रम

१ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट – महाजनादेश यात्रा

१५ ऑगस्ट ते  १सप्टेंबर – विधानसभा स्तरावर नवमतदार संवाद कार्यक्रम

निर्वाचित सदस्य संमेलन

१६ ऑगस्ट – स्व. अटलजी स्मृतीदिन (शक्ती केंद्रस्थानी बूथ कार्यकर्ता एकत्रीकरण)

तसंच गणेशोत्सवात सरकारच्या लोककल्याणकारी योजनांवर आधारित सजावट

तसेच विविध प्रकारच्या स्पर्धा – गणेशोत्सव मंडळ तसंच घरगुती गणपतींसाठी