मुख्यमंत्री, पालकमंत्री हजर नसताना कसले भूमीपूजन करत होता ? – अजित पवार

0
1149

मुंबई, दि. २५ (पीसीबी) – जिल्ह्याचे पालकमंत्री आणि मुख्यमंत्री उपस्थित नसताना कसले भूमीपूजन करत होता ? असा सवाल करून शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांना स्वत:चे महत्व वाढवायचे होते का? असा सवालही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे.

शिवस्मारक बोट दुर्घटनाप्रकरणी अजित पवार यांनी सरकारवर तोफ डागली आहे. मुंबईतील अरबी समुद्रातील शिवस्मारकाच्या पायाभरणी कार्यक्रमाला जाताना स्पीड बोट दगडावर आपटून बुडाली. यावेळी २५  जणांना बाहेर काढण्यात आले. तर चार्टर्ड अकाउंटंट असलेल्या ३६ वर्षीय सिद्धेश पवार याचा  पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनंतर विरोधी पक्षांनी सरकारवर हल्ला चढवला आहे.

तर अजित पवार यांनी अनेक प्रश्न उपस्थित करून विनायक मेटे यांना स्वत:चे महत्व वाढवायचे होते का ? असा सवाल केला आहे. तर हा अपघात आहे की  घातपात ? अशी शंका  काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी उपस्थित केली आहे. दरम्यान, या दुर्घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश   मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. तसेच मृत पवार यांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत देण्याचे जाहीर केली आहे.