“मुख्यमंत्री घरी बसून खूप काळजीपूर्वक काम करत आहेत. ते आम्हाला वरुन सूचना देतात”

0
342

मुंबई,दि.२८(पीसीबी) – राज्यात दोन मुख्यमंत्री आहेत, एक मातोश्रीमध्ये, तर दुसरे राज्यभर फिरत आहेत, अशा शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार या दोघांवर निशाणा साधला होता. या टीकेला आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रत्युत्तर दिलंय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घरी बसून खूप काळजीपूर्वक काम करत आहेत. त्याचे आम्ही सर्व साक्षीदार आहोत. ते आम्हाला वरुन सूचना देतात, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलंय.

राज्यातील सर्व विभागामध्ये, जिल्ह्यामध्ये प्रत्येक आठवड्याला संपूर्ण राज्याची माहिती घेण्याचे काम कलेक्टर, कमिशनर, एसपीकडून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आम्ही स्वतः घेत असतात. त्यावेळी ते सूचना देत असतात, असं टोपे यांनी म्हटलं आहे.

टीम लीडर म्हणून त्यांनी सर्वांना सूचना देणं हेच अभिप्रेत आहे. आमच्यासारख्या लोकांनी फ्रंटवर जाऊन काम करणे हे अभिप्रेत आहे आणि ते आम्ही करतो आहोत, असं राजेश टोपेंनी यावेळी सांगितलं.

दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आम्हाला सूचना देतात. ही योग्यच गोष्ट आहे. अजिबात चुकीचा काहीच विषय नाही. ते जिथे गरजेचे आहे तिथे तत्परतेने लक्ष देत आहेत. एवढं मी खात्रीपूर्वक सांगेन, असंही राजेश टोपेंनी सांगितलंय.