मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ‘या’ मतदारसंघातून निवडणूक लढवणार!

0
329

मुंबई, दि.१० (पीसीबी) – उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदावर विराजमान झाले आहेत. ,मात्र ते कोणत्याही सभागृहाचे सदस्य नाहीत. त्यामुळे त्यांना सहा महिन्यांच्या कालावधीत दोन्हीपैकी एका सभागृहात निवडून यावे लागणार आहे .महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बीड विधानपरिषदेची पोटनिवडणूक लढवण्याची चिन्हे आहेत. विधानपरिषदेचे माजी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे विधानसभेवर निवडून गेल्यामुळे त्यांची जागा रिक्त झाली आहे. त्यामुळे या जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. त्यादृष्टीने शिवसेनेने चाचपणी सुरु केली असून ठाकरे बीड विधानपरिषदेची पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता आहे.