शिवसेनेला मोठा धक्का; अब्दुल सत्तार यांचा राज्यमंत्रीपदाचा राजीनामा

0
407

मुंबई,दि.४(पीसीबी) – राज्यमंत्री पद आणि जिल्हा परिषद अध्यक्षपदावरून अब्दुल सत्तार कमालीचे नाराज होते, या नाराजीतूनच सत्तार यांनी राज्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. सत्तार यांची नाराजी दूर करण्यासाठी अर्जुन खोतकर यांनी त्यांची भेट घेतली होती. मात्र अब्दुल सत्तार यांची मनधरणी करण्याचे खोतकरांचे प्रयत्न फोल ठरले.

लोकसभा निवडणुकीत औरंगाबादमधून उमेवारी न मिळाल्याने माजी मंत्री अब्दुल सत्तार नाराज होते. त्यामुळे त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. जिल्ह्यातून काँग्रेसला संपवू असा शब्द त्यांनी दिला. पण विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडी झाली आणि शिवसेना, काँग्रेस एकत्र आले. यामुळे सत्तार यांची गोची झाली.

आताही सत्तेची समीकरण शिवसेनेच्या बाजुने असल्याने जिल्हा अध्यक्ष हा शिवसेनेचा असावा अशी सत्तार यांची इच्छा आहे. पण जिल्हा अध्यक्ष पद काँग्रेसकडे जावे असे महाविकास आघाडीचे ठरले आहे. यामुळे सत्तार यांची मनधरणी करण्यात खोतकर यशस्वी होणार का ? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.