मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी नवाब मलिक यांची निवड

0
438

मुंबई, दि. ६ (पीसीबी) – सचिन अहिर यांनी पक्षाला जय महाराष्ट्र करत शिवसेनेचा भगवा हाती घेतला. त्यामुळे रिक्त झालेल्या मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसच्या विभागीय अध्यक्षपदी पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांची निवड करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या आदेशानुसार प्रदेशाध्यक्ष व आमदार जयंत पाटील यांनी नवाब मलिक यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष आणि माजी आमदार सचिन अहिर यांनी  नुकताच शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर आता या पदाची जबाबदारी नवाब मलिक यांच्या खांद्यावर देण्यात आली आहे.