“मी १२० जणांची यादी दिल्यानंतर कदातिच ईडीकडे खूप काम येईल”

0
228

मुंबई,दि.२९(पीसीबी) – शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने नोटीस पाठवली आहे. याच पार्श्ववभूमीवर संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधत मी ‘१२० जणांची यादी दिल्यानंतर कदातिच ईडीकडे खूप काम येईल’ असा टोला लगावला आहे.

“जी गोष्ट आम्हाला लोकांसमोर ठेवायची होती ती पत्रकार परिषदेत सांगितली आहे. अजून काही गोष्टी आहे त्यादेखील सांगेन. आम्ही जे सांगितलं आहे ते ईडी आणि देशासाठी मार्गदर्शक असेल,” असं संजय राऊत यावेळी म्हणाले. “मी अद्याप नोटीस पाहिलेली नाही. नोटीस माझ्या नावावर नाही. मला नोटीस पाहण्याची गरज नाही. हे सगळं राजकारण कसं चालतं मला माहिती आहे, त्यामुळे हे सुरु राहू दे आम्ही उत्तर देऊ,” असंही त्यांनी सांगितलं.

दरम्यान “देशात आजही कायदा असून त्याचा सन्मान केला पाहिजे. देशात सध्या इतर कोणतीही मोठी गोष्ट नाही. मी १२० जणांची यादी दिल्यानंतर कदातिच ईडीकडे खूप काम येईल,” असा टोला संजय राऊत यांनी लगावला. “आमच्याकडे लपवण्यासाऱखं काही नाही. कागदपत्रांमध्ये ही माहिती उघड आहे,” याचा त्यांनी पुनरुच्चार केला.