मी सुखरुप आहे, अपघाताचे वृत्त खोटे; खासदार प्रीतम मुंडेंचा खुलासा

0
709

मुंबई, दि. २९ (पीसीबी) –  बीडच्या भाजप खासदार प्रीतम मुंडे यांनी आपल्या अपघाताचे वृत्त खोटे असल्याचे सांगून ते फेटाळून लावले आहे. मी सुखरुप  आहे, कोणताही अपघात झालेला नाही, असे पत्र लिहून  त्यांनी सोशल मिडीयावर व्हायरल केले आहे.

आज (शनिवारी) दुपारी प्रीतम मुंडे या अपघातातून बचावल्याचे वृत्त सोशल मीडीयावर चांगलेच व्हायरल झाले. त्यानंतर त्यांना खुशाली विचारण्यासाठी अनेकांचे फोन येऊ लागले. त्यामुळे  त्यांनी स्वत:च्या हस्ताक्षरात पत्र लिहून त्यांनी खुलासा केला आहे.

शुक्रवारी (दि. २८) खासदार मुंडे यांनी  मुंबई- औरंगाबाद असा  विमान प्रवास केला होता. त्यावेळी खराब हवामानामुळे काहीवेळ विमानाला  धक्के बसल्याचे वृत्त समोर आले होते. यावर अपघात वगैरे काहीही झालेला नाही. इजा झालेली नाही. प्रत्येक फोन, मसेजला उत्तर देवू शकत नाही, म्हणून हे पत्र व्हायरल करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.