सिंहगड येथील पेस्ट कंट्रोलमुळे विषबाधा झालेल्या कुटूंबातील दुसऱ्या मुलाचाही मृत्यू

0
462

पुणे, दि. २९ (पीसीबी) –  पेस्ट कंट्रोलमुळे एकाच कुटुंबातील चार जणांना विषबाधा झाल्याची घटना पुण्यातील सिंहगड परिसरात घडली होती. त्यातील एका मुलाचा मंगळवारी (दि.२५) उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. तर शुक्रवारी (दि.२८) या कुटुंबातील दुसऱ्या मुलाचाही मृत्यू झाला.

साहील डोंगरे असे मृत मुलाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  सिंहगड परिसरातील आनंदनगर परिसरात संदीप डोंगरे आपल्या कुंटुबीयांसह राहतात. त्यांचा पेस्ट कंट्रोलचा व्यवसाय आहे. घरात ढेकून झाल्यामुळे त्यांनी सोमवारी (दि.२४) घरात पेस्टे कंट्रोल केले. यानंतर ते पत्नी आणि मुलांसोबत घराबाहेर पडले. काही वेळानंतर सर्वजण रात्री घरी येऊन झोपी गेले. दरम्यान, मध्यरात्री सर्वांना उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला. यामुळे शेजारी आणि नातेवाईकांनी त्यांना सिंहगड परिसरातील खासगी रुग्णालयात दाखल केले. चारही जणांवर उपचार सुरू असतांना सार्थक डोंगरे या मुलाचा मंगळवारी ससून रुग्णालयात मृत्यू झाला. तर साहिल याचा शुक्रवारी उपचारादम्यान मृत्यू झाला. संदीप आणि त्यांच्या पत्नीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे सिंहगड रोड परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सिंहगड पोलीस तपास करत आहे.