मी शरद पवार यांचा पूर्वीपासून समर्थक आहे – रामदास आठवले

0
657

पुणे,दि.२३(पीसीबी) – नक्षलवाद्यांशी संबंध नसलेल्यांवर कारवाई झाली असल्याचं पवार यांना वाटत असेल, तर संबंधित पोलिसांची चौकशी झाली पाहिजे,मी पवार यांचा पूर्वीपासून समर्थक आहे. असं सांगून केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या भूमिकेला रविवारी पाठिंबा दर्शविला.

पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेत नक्षलवादाशी संबंध नसलेल्यांवर झालेल्या कारवाईप्रकरणी पोलिसांची चौकशी करण्याची मागणी शरद पवार यांनी केली आहे. पवार यांच्या या मागणीला आठवले यांनी पाठिंबा दिला. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या राज्य कार्यकारिणीची बैठक पुण्यात झाली. त्यानंतर पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.

राम मंदिर-बाबरी मशीद प्रकरणी निर्णय झाल्यानंतर मुस्लिम समाजाने शांतता राखली. मात्र, सुधारित नागरिकत्व कायद्यावरून समाजवादी पक्ष आणि कम्युनिस्ट पक्ष हे मुस्लिम समाजातील तरुणांना भडकवण्याचे काम करत आहेत, असंही रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.